Kolhapur: पिल्लाच्या कण्हण्याने हेलावले घरमालकाचे मन, खारुताईच्या पिल्लासाठी रात्री धावला वन विभाग
: एका मुक्या जीवाचा आर्त आवाज, त्याची जगण्यासाठीची धडपड आणि त्याला वाचवण्यासाठी रात्रीच्या वेळी धावून आलेल्या वन विभागाच्या अधिकाऱ्यांची माणुसकी... गोकुळ शिरगाव येथे घडलेली ही घटना भूतदया आणि संवेदनशीलतेचा सुंदर संदेश देणारी ठरली आहे. इंटरनेटवर माहिती शोधून पिल्लाला उब मिळावी म्हणून मऊ पायमोज्यात ठेवून घरमालकाने डब्यात सुरक्षित केले.शनिवारी सकाळी सहा वाजल्यापासून एका घराच्या दुसऱ्या मजल्यावरील खोलीतून सतत कण्हण्याचा आवाज येत होता. सुरुवातीला तो नेमका कशाचा आहे, याची कल्पना नव्हती. मात्र दिवसभर तो आवाज सुरूच राहिल्याने सायंकाळी घरमालक रामदास पाटील यांनी खोलीत जाऊन पाहिले. तेव्हा त्यांना एक अतिशय लहान, डोळेही न उघडलेले खारुताईचे पिल्लू दिसले. आईपासून दूर पडलेल्या त्या चिमुकल्या जीवाची अवस्था पाहून त्यांचे मन हेलावले. त्यांनी त्याला अलगद उचलून सुरक्षित ठिकाणी आणले.
इंटरनेटवर माहिती शोधून पिल्लाला उब मिळावी म्हणून मऊ पायमोज्यात ठेवून डब्यात सुरक्षित केले. काही वेळाने त्याची धडपड कमी झाली आणि ते शांत झोपल्यासारखे दिसू लागले. मात्र अशा पिल्लांची काळजी कशी घ्यावी, याची माहिती नसल्याने पुढे काय करावे, हा प्रश्न त्यांच्यासमोर होता. अखेर त्यांनी महाराष्ट्र वन विभागाच्या १९२६ हेल्पलाइनशी संपर्क साधला. त्यानंतर एका जीवाला वाचवण्याचा संवेदनशील प्रयत्न सुरू झाला.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0