हातात सिगारेट, बाजुला बाटली... नशेत तर्रर्र तरुणीचा रस्त्याच्या मधोमध धिंगाणा, Video व्हायरल!

Jun 24, 2026 - 15:32
 0  0
हातात सिगारेट, बाजुला बाटली... नशेत तर्रर्र तरुणीचा रस्त्याच्या मधोमध धिंगाणा, Video व्हायरल!

उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडामध्ये एका तरुणीने दारूच्या नशेत रस्त्याच्या मधोमध झोपून प्रचंड गोंधळ घातल्याची घटना घडली. या हायड्रॉमामुळे रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली, ज्यामुळे वाहनचालकांना आणि स्थानिक नागरिकांना मोठा मानसिक त्रास सहन करावा लागला. याप्रकरणी बिसरख कोतवाली पोलिसांनी तातडीने पावले उचलत संबंधित तरुणीवर कायदेशीर कारवाई केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना १ जून २०२६ रोजी बिसरख कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. संबंधित तरुणी ग्रेटर नोएडा वेस्टमधील आम्रपाली रिव्हर व्ह्यू सोसायटीमध्ये राहणारी आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तरुणीच्या हातात सिगारेट आणि बाजूला दारूची बाटली पडलेली दिसत आहे. रस्त्यावरून जाणाऱ्या अनेक नागरिकांनी तिची समजूत काढण्याचा आणि तिला बाजूला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ती कोणाचेही ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हती. तरुणी रस्त्याच्या मधोमध झोपल्यामुळे या मार्गावरील वाहतुकीचा वेग मंदावला आणि काही काळ मोठी वाहतूक कोंडी झाली.

घटनेची माहिती मिळताच बिसरख कोतवाली पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठले. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत तरुणीला रस्त्यावरून बाजूला केले आणि सुरक्षित ठिकाणी हलवले. तरुणीला पोलीस ठाण्यात आणल्यानंतर तिची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. मेडिकल अहवालात ती नशेत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर तिच्याविरुद्ध आवश्यक त्या कलमांखाली कायदेशीर कारवाई करण्यात आली.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0